Saturday, March 19, 2011

आम्ही बी-घडतोय तुम्ही बी-घडाना.

आम्ही बि-घडलो अन तुम्ही बी-घडा ना! - अश्या नावाचं एक गाणं आहे. ते गाणं मला आज आठवलं.

मी लहान असतांना, आम्ही कॉलोनी मधले सगळे मित्र मंडळी होळी साजरी करत होतो.
आम्ही मोठी होळी पेटवायचो. होळी च्या नावाने बोंबा मारायचो. होळी मधला भाजलेला नारळ फोडून खायचो
आणि घरी जाऊन पुरण पोळी वर ताव मारायचो. आणि हो आम्हाला ती गोष्ट पण माहित होती बर का!
होलिका आत्या ची.
तर ती गोष्ट अशी आहे कि, हिरण्यकश्यपू नावाचा एक दुष्ट राक्षस, राजा होऊन गेला. त्याला असा वाटायचा
कि तो देव आहे. पण त्याचाच मुलगा प्रल्हाद हा त्याचं नाव ना घेता विष्णूची भक्ती करायचा. तर त्या दुष्ट राजाला
प्रल्हादाला ठार मरायचा होता. त्या राजाची बहिण होलिका, ती पण दुष्टच वाईट स्वभावाची. तिला म्हणे शक्ती होती
कि तीला आग काही करू शकत नाही. तर तो राजा किंवा राक्षस अस ठरवतो कि होलिका प्रल्हादाला मांडीवर घेऊन
बसेल आणि मग त्यांना आग लावायची. आणि त्या आगीच्या दाहाने प्रल्हाद मरेल. तर तेंव्हा अस होता कि त्या
आगीत होलिका भस्म होते आणि प्रल्हाद जिवंत राहतो.
तर हि ती गोष्ट.

तर तुम्ही म्हणाल या सगळ्याचा आणि त्या गाण्याचा काय संबंध ? तर एका वर्षी माझ्या आम्ही हे गाणं म्हटलं
होतं होळी च्या दिवशी. आमच्या मित्र मंडळींपैकी एकाच्या वडिलांनी ते गाणं म्हटलं होतं आणि त्यांच्या मागून आम्ही.
आणि ते खरच किती अर्थपूर्ण आहे आणि होळीच्या सणाशी किती जवळ आहे. खरच आपण होळी का साजरी करतो.
हा विचार करण्या सारखा आहे ती होलिकेची गोष्ट खरी आहे का कि खोटी ते राहू दे बाजूला.

आपण होळी साजरी करतो ती मनातील वाईट विचारांचा दहन करायला, वाईट वृत्तींचा दहन करायला.
आणि फ़क़्त नाही ते होळी करून प्रदूषण करायला, आणि पुरणाची पोळी खाउन सुट्टी एन्जोय करायला. उलट जाळपोळ करून
बोंबा मारून तुम्ही त्या सणाचा अपमान करता आणि वाईट विचारच पसरवता.

मग दोन विचार मनात येतात. आपल्या मनातला प्रदूषण दूर करणे आणि वातावरणातला प्रदूषण कमी करणे,
समाजातला प्रदूषण कमी करणे. तेंव्हा हा सण साजरा करतांना प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे कि मी हे सगळं कसं करू शकेन आणि पुढचा वर्ष हे सगळा करायचा प्रयत्न केला पाहिजे. तर मला थोडेसे त्या गाण्याचे शब्द बदलावेसे वाटतात.
आम्ही बी-घडतोय तुम्ही बी-घडाना .....

4 comments:

  1. Masta lihila ahe...i agree with pollution part..I think everyone should just meet and have a get together with lots of puran holi :)

    ReplyDelete
  2. Thank you for the nice gyan! I really did not know the reason we celebrate holy!!

    I have some bad memories of Holy though! I burnt my foot badly when I entered the pit next day morning :(

    ReplyDelete
  3. awesome! the point of the bornfire was to burn all the trash, dead levaes and twigs that have fallen over the winter - a sort of 'spring cleaning' and the fire represents the mythological story..
    Playing with colors is a totally different practice related to the harvest.. all of nature's colors and her immense wealth of fertility is celebrated. good thoughts!

    ReplyDelete
  4. Nice addition of thoughts to this page Shaunak.
    I wanted to bring that but that might have overrun the main point of this.

    ReplyDelete